अभिप्राय
मराठी भाषिक माणसांवर विलक्षण प्रभाव असणारे संतकवी तुकाराम यांच्या निवडक शंभर उपदेशपर अभंगाचे संकलन व अथसहित विश्लेषण असणारा ‘ तुका म्हणे ‘ हा विजय गवळी यांचा ग्रंथ महत्वपूर्ण आहे . ‘ प्रबोधन ‘ मूल्य असणारे हे ‘ अभंग ‘ मानवी मनाचे ‘ उन्नयन ‘ करुन त्यास संस्कारीत करणारे आहेत . तुकोबांच्या समाज उद्धाराच्या कळवळ्यातून अविष्कृत झालेल्या या अभंगांचे तितकेच अर्थवाही व मर्मग्राही परिशीलन गवळींनी केले आहे .







