अभिप्राय
विजय गवळी यांचे ‘ संत तुकारामांचे १००० सुविचार ‘ हे संत तुकारामांच्या अत्युत्तम वचनांचे संकलन केवळ संत तुकारामांच्या चाहत्यांनाच नव्हे , तर सर्व मराठी भाषकांना आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे . . . गवळी यांनी संत तुकारामांची वचने नुसती निवडलेलीच नाहीत , तर त्यांचा मराठी गद्यात अर्थही दिला आहे . वाचकांना एखाद्या मूळ वचनातील एखादा शब्द अवघड वाटला किंवा एखाद्या वचनाचा अर्थ नीट समजला नाही , तर त्यांना या गद्य अर्थाची मदत होऊ शकेल . . . प्रत्येकाला या संकलनातून कोणतीना कोणती वचने कल्याणकारक म्हणून उपयुक्त ठरतीलच . येथून कोणालाही रिकाम्या हाताने मागे फिरावे लागणार नाही . कोणाचीही झोळी रिकामी राहणार नाही . . . वाचक विजय गवळी यांच्या प्रस्तुत संकलनाचे स्वागत करतील , असा मला विश्वास वाटतो . मी त्यांच्या लेखनास अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो . आ . ह . साळुखे







